Mandelbaum, David G.
BHartatil Samaj भारतातील समाज (Marathi) - New Delhi Sage Bhasha 2019c - xiv;453p.vol.1 pb 13*21
भारतीय समाजाचे हे व्यापक विश्लेषण, या समाजातील गुंतागुंत समजून घेण्यासाठी करण्यात आलेल्या आधुनिक सामाजिक संशोधनाचा परिपाक आहे. भारतातील समाज हे पुस्तक सामाजिक संबंधांना व्यवस्था आणि उपव्यवस्थांच्या स्वरूपात पाहते. हे संबंध स्थिर आणि कुंठित नसून, प्रवाही आणि बदल आत्मसात करणारे आहेत. वर्षानुवर्षांच्या मानसशास्त्रीय आणि सामाजिक संकल्पनांवर ते आधारित असतात.
या आवृत्तीमध्ये दोन खंडांचा समावेश आहे. खंड एक: सातत्य आणि बदल सामाजिक व्यवस्था आणि जातिव्यवस्थेचा आढावा घेतो. हे करताना भारतीय समाजातील महत्त्वाच्या घटकांची व्याख्या मांडतो. यातील प्रकरणांमध्ये नातेसंबंधांची गुंतागुंत, त्यांचे मानसशास्त्रीय परिणाम, त्यांतून होणारी सांस्कृतिक घुसळण याचा परामर्श घेण्यात आला आहे. खंड दोन: बदल आणि सातत्य सामाजिक बदलांवर भाष्य करतो. ते नियमित असतात किंवा रचनात्मक असतात. मानसिकतेतील बदल आणि सामाजिक प्रक्रिया यांच्या परस्परसंबंधांची चर्चा या खंडात आढळते. आधुनिक समाजातील बदल कशा प्रकारे घडून येत आहेत, यावरही भाष्य आहे.
9789353285456
301.0954 / Man