Bhai , L. Thara

Bhartey Samajshastracha Abhyas : Bhartey Samajsastra: Samasya Ani Avhaane भारतीय समाजशास्त्राचा अभ्यास : भारतीय समाजशास्त्र समस्या आणि आव्हाने - New Delhi Sage Bhasha 2017c - xxxvi;273p.vol 1 pb 13*21

संपूर्ण भारताला एक समाज म्हणून विचारात घेण्याची पारपंरिक वृत्ती आणि भारताकडे एक राष्ट्र-राज्य म्हणून पाहण्याचा नैसर्गिक कल याविषयीची तपासणी भारतीय समाजशास्त्रज्ञांमार्फत होऊ लागली आहे.‘भारतीय समाजशास्त्राचा अभ्यास’ हा बहुप्रबंधक खंड या परिणामांचाच एक भाग ठरतो.

‘भारतीय समाजशास्त्राचा अभ्यास’ या खंडात आलेले निबंध हे एकेकट्याने किंवा सामूहिक स्वरूपात भारतीय समाजाच्या व समाजशास्त्र अभ्यासाच्या एक किंवा अनेक पैलूंचे विश्लेषण करतात. त्या दृष्टीने हा खंड म्हणजे खरोखरीच भारतीय समाजशास्त्राविषयीचा शोधकदीप ठरतो. तसेच, भारतीय समाजशास्त्रज्ञांना आत्मनिरीक्षणासाठी प्रवृत्त करतो. भारतीय समाजशास्त्र संस्थेच्या (आयएसएस) अधिकृत मुखपत्रातून प्रस्तुत निबंधांची काळजीपूर्वक निवड प्रा. एल. थारा भाई यांनी केली आहे. समाजशास्त्र प्रगल्भ झाल्यानंतर आणि भारतात लोकप्रिय झाल्यानंतर विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा अशा विविध स्तरांवर या विद्याशाखेचा विस्तार झाला. इतर विद्याशाखांनाही समाजशास्त्राची दखल घ्यावी लागते.

दुसरीकडे, आधुनिकतेची तीव्र लाट आणि जागतिकीकरणाचा रेटा यांनी या विद्याशाखेसमोर नवे आव्हान उभे केले. त्यांची दखल आधुनिक समाजशास्त्रानेही घेतलेली दिसून येत आहे.

9789385985379


India Sociology

301.0954 / Tha

Homi Bhabha Centre for Science Education,TIFR, V. N. Purav Marg, Mankhurd Mumbai, 400088

Tel. No.: 25072303 | 25072337 Email: library@hbcse.tifr.res.in