Normal view MARC view ISBD view

Aaple Vruksha (Marathi) (आपले वृक्ष)

By: Mahajan, Shridhar D. (महाजन, श्रीधर दत्तात्रय).
Material type: materialTypeLabelBookSeries: 1. Publisher: Pune ; Nature Walk ; 2009Description: 190p; pb; 9x5.5.Subject(s): DDC classification: 582.160954 | Summary: वनस्पतीशास्त्र व पर्यावरणशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक, श्री. द. महाजन ह्यांना निसर्गप्रेमी आदराने वनस्पतींचा चालता बोलता ज्ञानकोश संबोधतात. महाजन सर तथा बापू जंगली म्हणवून घेण्यात स्वतःचा गौरव समजतात. त्यांच्या प्रदीर्घ भटकंती, व्यासंग आणि संशोधनाचे फलित म्हणजे 'आपले वृक्ष' वृक्षांशी एकरूप होऊन, जणू त्यांच्याशी संवाद साधून शब्दबध्द झालेली ही वृक्षगाथा. सर्वसामान्य वाचकांपासून ते वनस्पतीशास्त्रज्ञांपर्यंत सर्वांगीण ओळख करून देणारा ग्रंथ. साध्या, सरळ, मनोरंजक भाषेत सांगितलेली शास्त्रीय माहिती आणि संस्कृत वाड्मय तसेच आयुर्वेदिक ग्रंथातील संदर्भ यांचा आगळावेगळा मनोहारी संगम हे ह्या लिखाणाचे वैशिष्ठ्य. वृक्षांचे उपयोग लागवडीविषयीचे ज्ञान आणि आढळण्याची ठिकाणे दिल्यामुळे त्याची उपयुक्तता वाढली आहे. वैद्यकीय व्यावसायिक असलेले डॉ. पराग महाजन हे वनस्पती अभ्यासक आणि पर्यावरणशास्त्राचे उच्च पदवीधरही आहेत. त्यांनी काढलेल्या प्रत्यक्षाहून सुंदर प्रतिमा असलेल्या प्रकाशचित्रांमुळे पुस्तकाचे देखणेपण द्विगुणीत झाले आहे. त्याचबरोबर वृक्षांचा नेमका, सहजसुंदर परिचय करून देण्याचे कामही साध्य झाले आहे.
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
    average rating: 0.0 (0 votes)

वनस्पतीशास्त्र व पर्यावरणशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक, श्री. द. महाजन ह्यांना निसर्गप्रेमी आदराने वनस्पतींचा चालता बोलता ज्ञानकोश संबोधतात. महाजन सर तथा बापू जंगली म्हणवून घेण्यात स्वतःचा गौरव समजतात. त्यांच्या प्रदीर्घ भटकंती, व्यासंग आणि संशोधनाचे फलित म्हणजे 'आपले वृक्ष' वृक्षांशी एकरूप होऊन, जणू त्यांच्याशी संवाद साधून शब्दबध्द झालेली ही वृक्षगाथा. सर्वसामान्य वाचकांपासून ते वनस्पतीशास्त्रज्ञांपर्यंत सर्वांगीण ओळख करून देणारा ग्रंथ.
साध्या, सरळ, मनोरंजक भाषेत सांगितलेली शास्त्रीय माहिती आणि संस्कृत वाड्मय तसेच आयुर्वेदिक ग्रंथातील संदर्भ यांचा आगळावेगळा मनोहारी संगम हे ह्या लिखाणाचे वैशिष्ठ्य. वृक्षांचे उपयोग लागवडीविषयीचे ज्ञान आणि आढळण्याची ठिकाणे दिल्यामुळे त्याची उपयुक्तता वाढली आहे.
वैद्यकीय व्यावसायिक असलेले डॉ. पराग महाजन हे वनस्पती अभ्यासक आणि पर्यावरणशास्त्राचे उच्च पदवीधरही आहेत. त्यांनी काढलेल्या प्रत्यक्षाहून सुंदर प्रतिमा असलेल्या प्रकाशचित्रांमुळे पुस्तकाचे देखणेपण द्विगुणीत झाले आहे. त्याचबरोबर वृक्षांचा नेमका, सहजसुंदर परिचय करून देण्याचे कामही साध्य झाले आहे.

There are no comments for this item.

Log in to your account to post a comment.

Click on an image to view it in the image viewer

Homi Bhabha Centre for Science Education,TIFR, V. N. Purav Marg, Mankhurd Mumbai, 400088

Tel. No.: 25072303 | 25072337 Email: library@hbcse.tifr.res.in