Shaley Prashasan Aani Manavi Sambandh
By: Kalpande, Vasant.
Material type:
Item type | Current location | Call number | Status | Date due | Barcode | Item holds |
---|---|---|---|---|---|---|
![]() |
Education | 371.2/Kal (Browse shelf) | Available | 25482 |
या पुस्तकातील लेख हे लेखक डॉ. वसंत काळपांडे यांच्या प्रशासकीय अनुभवांची, प्रशासनविषयक चिंतनाची आणि चौफेर वाचनाची साक्ष देतात. या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी शिक्षकांशी व मुख्याध्यापकांशी एक प्रकारे काहीसे अनौपचारिक असे हितगूज केलेले दिसून येते. प्रयोगशील मुख्याध्यापकांसमोर तसेच शिक्षकांसमोर येणार्या अध्यापनविषयक, प्रशासकीय स्वरूपाच्या आणि शिक्षक-पालक संबंधांविषयीच्या अनेकविध समस्यांची उकल कशी करावी, याचे मार्गदर्शन लेखकाने या पुस्तकातून केले आहे. शालेय वातावरणात विद्यार्थ्यांचा विविधांगी विकास साधत असताना शिक्षक-शिक्षक, शिक्षक-मुख्याध्यापक, शिक्षक-पालक आणि विद्यार्थी-विद्यार्थी या व अशा परस्पर संबंधांतून उद्भवणार्या समस्यांची दखल लेखकाने घेतली असून, केवळ तात्त्विक चर्चा न करता उदाहरणे देऊन प्रत्येक समस्या स्पष्ट केली आहे. शिक्षण संस्थांमध्ये विविध स्तरांवर कार्य करणार्या प्रशासकांना व अध्यापकांना त्यांच्या कार्यात या पुस्तकामुळे बहुमोल मार्गदर्शन मिळेल. अध्यापक विद्यालये आणि शिक्षणशास्त्र महाविद्यालये यातून काम करणार्या प्राध्यापकांना आणि प्रशिक्षणार्थ्यांना हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल.
There are no comments for this item.